Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळज येथे रंबल स्ट्रीप स्पीड ब्रेकर होणे गरजेचे; भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी आमदार सचिन पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी

 


फलटण चौफेर दि २ नोव्हेंबर २०२५

काळज (ता. फलटण) येथे पालखी महामार्ग ९६५ वरती मेन चुकत5 रंबल स्ट्रीप प्रकारचे स्पीड ब्रेकर आमदार सचिन पाटील यांनी बसविण्या करीता संबधीत विभागाला सूचना कराव्यात जेणेकरून अन्यथा या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई इनामदार यांनी केली आहे.काळज हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून या गावातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी तडवळे, डोंबाळवाडी, घाडगेमळा तसेच आसपासच्या वाड्या-वस्त्यांवरून शाळेत यावे लागते. यासाठी या विद्यार्थ्यांना दररोज हायवे रस्ता क्रॉस करून जावे लागते, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असतो.



तसेच अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी, बँकेत व्यवहार करण्यासाठी किंवा लोणंद–फलटण मार्गे प्रवास करण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडतात. याशिवाय शेतकरी आपल्या शेळ्या, गुरेढोरे घेऊनही हाच रस्ता पार करतात.



काळज येथून सासवड, हिंगणगाव तसेच सालपे मार्गे सातारा येथे जाणारी वाहने देखील या मार्गावरून वारंवार ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी वेगवान वाहनांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी NH-965 वर तातडीने रंबल स्ट्रीप स्पीड ब्रेकर बसवावेत. तसेच आमदार सचिन पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती वसीमभाई इनामदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.